Showing posts with label अभ्यास. Show all posts
Showing posts with label अभ्यास. Show all posts

प्रार्थना : देवाला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग !

Sunday, December 20, 2009 1 comments



देवाला शरण जाऊन इच्छित गोष्ट तळमळीने व याचना करून मागणे, याला `प्रार्थना' म्हणतात. प्रार्थना केल्यामुळे देवाचा आशीर्वाद, शक्ती व चैतन्य यांचा लाभ होतो. प्रार्थनेमुळे चिंता कमी होऊन देवावरील श्रद्धा वाढते व मन एकाग्र होते. प्रार्थनेमुळे वाईट शक्तींपासून रक्षणही होते.

प्रतिदिन करावयाच्या काही प्रार्थना

स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना : `हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझे शरीर शुद्ध होण्याबरोबरच
अंत:करण निर्मळ होऊ दे आणि तुझे चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे.'

अभ्यासापूर्वी करावयाची प्रार्थना : `हे विघ्नहर्ता व बुद्धीदाता श्री गणेशा, माझ्या अभ्यासात येणारे
अडथळे दूर होऊ देत. माझा अभ्यास चांगला होण्यासाठी तू मला सुबुद्धी व शक्ती दे.'

अन्न ग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना : `हे अन्नपूर्णामाते, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून
तुझा `प्रसाद' या भावाने माझ्याकडून ग्रहण केला जाऊ दे. या प्रसादातून मला शक्ती व चैतन्य मिळू दे.'

(अधिक माहितीसाठी सनातनच्या सत्संगांचा लाभ घ्या !)

Read the full story

वाचतांना आपल्या डोळयांची काळजी कशी घ्यावी ?

study-room

वाचन असे करावे : वाचन नेहमी ताठ बसून करावे. वाचतांना टेबल व खुर्ची स्थिर असावी, तसेच
पुस्तक व डोळे यांच्यातील अंतर ३० ते ३५ सें.मी. इतके असावे. वाचण्याच्या खोलीत भरपूर प्रकाश
असावा. शक्यतो पुस्तकावर प्रकाश मागून व डाव्या बाजूने असावा, म्हणजे उजव्या हातात पुस्तक
धरून वाचतांना बोटांची सावली पडणार नाही. झोपून वाचन करणे टाळावे.

वाचन करतांना डोळे अधूनमधून बंद करावेत : वाचन, संगणकावर टंकलेखन, तसेच चित्रकला,
शिवणकाम इत्यादी बराच वेळ करावे लागत असल्यास दर १५ ते २० मिनिटांनंतर थोडा वेळ थांबावे.
डोळे १ ते २ मिनिटांसाठी बंद करावेत. एखाद्या वस्तूवर ध्यान करावे किंवा दूरच्या एखाद्या वस्तूवर
दृष्टी स्थिर करावी. नंतर वाचन पुन्हा सुरू करावे.

(अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ `दिनचर्या व त्रतूचर्या यांनुसार साधना')

Read the full story

विद्यार्थ्यांनो, श्री संकटनाशक गणपतिस्तोत्राचे पारायण करा !

Thursday, December 17, 2009 1 comments




काही विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते. `वाचलेले माझ्या लक्षात राहील ना ?\', `ऐन परीक्षेच्या वेळी लिहितांना मला आठवेल ना ?\' अशा प्रश्‍नांमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना ताण येतो. या सर्वांवर आध्यात्मिक उपाय म्हणजे गणपतिस्तोत्राचे पारायण.
श्री गणेशस्तोत्राचे पारायण करण्याची पद्धती
१. पूर्व दिशेला तोंड करून आसनावर बसावे.
२. शक्य असल्यास पद्मासन अथवा सुखासनात बसावे.
३. अर्धा पेला पाणी घेऊन त्यात थोडी विभूती घालावी.
४. गणपतीला मनापासून प्रार्थना करावी.
५. श्री गणपतीस्तोत्रातील श्लोक क्र. २ ते ४ (`प्रथमं वक्रतुंडच\'पासून `द्वादशन् तू गजानन\'पर्यंत) ११० वेळा म्हणावे.
६. १११ व्या वेळेला पूर्ण गणपतीस्तोत्र म्हणावे.
७. शेवटी गणपतीला मनापासून कृतज्ञता व्यक्‍त करावी.
८. अर्ध्या तासात हे पारायण पूर्ण होते. त्यानंतर श्रद्धापूर्वक तीर्थ (पेल्यातील विभूतीचे पाणी) प्राशन करावे. वरीलप्रमाणे गणपतिस्तोत्राचे पारायण ११ दिवस करावे.

गणपतिस्तोत्राच्या पारायणाचे लाभ
१. मनाची एकाग्रता वाढते.
२. एक-दोनदा वाचूनही लक्षात रहाते. थोडक्यात स्मरणशक्‍ती वाढते.
३. गणपती ही बुद्धीची देवता असल्याने बुद्धी सात्त्विक व सूक्ष्म होते.
- प.पू. पांडे महाराज

Read the full story

अभ्यासात एकाग्रता कशी साधाल ?



अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आवडत्या देवतेचा पाच ते दहा मिनिटे नामजप करावा. बुद्धीची देवता गणपति व विद्येची देवता सरस्वती यांना अभ्यास चांगला होण्यासाठी व लक्षात रहाण्यासाठी `हे विघ्नहर्ता, बुद्धीदाता श्रीगणेशा व श्री सरस्वतीदेवी, माझ्या अभ्यासात येणारे अडथळे दूर होऊ देत. माझा अभ्यास चांगला होण्यासाठी तू मला सुबुद्धी व शक्‍ती दे.\' अशी प्रार्थना करावी. रोज एका विशिष्ट जागी अभ्यासासाठी बसणे जास्त योग्य होय. मन व शरीर ताजेतवाने असतांना अवघड वाटणार्‍या विषयांचा अभ्यास विशिष्ट वेळीच करणे योग्य ठरते. अभ्यासाला बसण्याच्या जागी उदबत्ती लावल्यास वातावरण चांगले होण्यास मदत होते. पुरेसा उजेड असलेली व शक्यतो इतर आवाज ऐकू येत नसतील, अशा ठिकाणी अभ्यासाची जागा निवडावी. अभ्यास पूर्ण झाल्यावर गणपति व सरस्वती यांच्या चरणी एकाग्रतेने अभ्यास करून घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करावी. Read the full story