अभ्यासात एकाग्रता कशी साधाल ?

Thursday, December 17, 2009 Leave a Comment



अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आवडत्या देवतेचा पाच ते दहा मिनिटे नामजप करावा. बुद्धीची देवता गणपति व विद्येची देवता सरस्वती यांना अभ्यास चांगला होण्यासाठी व लक्षात रहाण्यासाठी `हे विघ्नहर्ता, बुद्धीदाता श्रीगणेशा व श्री सरस्वतीदेवी, माझ्या अभ्यासात येणारे अडथळे दूर होऊ देत. माझा अभ्यास चांगला होण्यासाठी तू मला सुबुद्धी व शक्‍ती दे.\' अशी प्रार्थना करावी. रोज एका विशिष्ट जागी अभ्यासासाठी बसणे जास्त योग्य होय. मन व शरीर ताजेतवाने असतांना अवघड वाटणार्‍या विषयांचा अभ्यास विशिष्ट वेळीच करणे योग्य ठरते. अभ्यासाला बसण्याच्या जागी उदबत्ती लावल्यास वातावरण चांगले होण्यास मदत होते. पुरेसा उजेड असलेली व शक्यतो इतर आवाज ऐकू येत नसतील, अशा ठिकाणी अभ्यासाची जागा निवडावी. अभ्यास पूर्ण झाल्यावर गणपति व सरस्वती यांच्या चरणी एकाग्रतेने अभ्यास करून घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करावी.

3 comments »

  • Unknown said:  

    माझ्या मुलाचे अभ्यासात लक्ष्य लागत नाही. तो अभ्यास करायला बसतो पण त्याला काही समजत नाही. काय करावे ? आपण मला सांगतल का ?

  • Unknown said:  

    काही विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते. `वाचलेले माझ्या लक्षात राहील ना ?\', `ऐन परीक्षेच्या वेळी लिहितांना मला आठवेल ना ?\' अशा प्रश्‍नांमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना ताण येतो. या सर्वांवर उपाय आपल्याला येथे वाचता येइल.


    http://balsanskar.blogspot.com/2009/12/blog-post_763.html

  • punam said:  

    It is really very good site to see, got various type of information.